कळे (प्रतिनिधी) : सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत  पन्हाळा तालुक्यातील मरळी गावचा पै. सिध्देश पाटील याने पहिलीच मानाची चांदीची गदा पटकावली. त्यामुळे मरळीच्य शिरेपेचात मानाचा आणखीन एक तुरा खोवला गेला आहे.

पन्हाळा तालुक्यातील मरळी येथील पै. युवराज पाटील कुस्ती क्रिडा संकुल, कुडीत्रे तालीमीचा पै. सिद्धेश पाटील सराव करतो. पाटील याने सातारा जिल्ह्यांतील मोरगीरी माणगांव येथील कुस्ती मैदानात ५० किलो वजनी गटात प्रथम येऊन चांदीची गदा आणि रोख रक्कम अकरा हजारांचे बक्षीस पटकावले. यावेळी समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि ग्रामपंचायत मरळी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी एस. एम. पाटील, संभाजी पाटील,  सरपंच शहाजी कांबळे, समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बच्चे, उपाध्यक्ष बाजीराव वरपे, उपसरपंच कल्पना पाटील, दादू पाटील,वस्ताद तानाजी पाटील आदी उपस्थित होते.