नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर आता लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे  सीडीएसपदाची धुरा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. लष्कराच्या तिन्ही दलांचे जे प्रमुख असतात. त्याच वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी दिली जाते. रावत यांच्यानंतर आता तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये नरवणे वरिष्ठ असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

 भारताच्या पहिल्या सीडीएसपदासाठी जनरल रावत यांच्या नावाची घोषणा  डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी सीडीएस समितीचे अध्यक्षपदसुद्धा त्यांच्याकडेच देण्यात आले होते. त्याआधी तिन्ही दलांच्या समन्वयासाठी लष्करात चेअरमन ऑफ द चीफ ऑफ स्टाफ कमिटी पद होते. तेव्हा लष्करातील वरिष्ठ असणाऱ्या व्यक्तीकडे या पदाची जबाबदारी दिली जात असे . आता सीडीएस पद रिक्त असल्याने सध्या तरी चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपद लष्कर प्रमुख जनरल नरवणेंकडे देण्यात आले आहे.