मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची सुवर्णपदकाला गवसणी

0
10

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्रांक्ष पाटील याने ईजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या प्रेसिडेंट कपच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्रासह भारताचे नाव मोठे केले आहे. या कामगिरीमुळे जागतिक शूटर ऑफ द इअरसह सुवर्णपदकाचा पहिला भारतीय मानकरी रुद्रांक्ष ठरला आहे. त्याला तब्बल १५००० डॉलरचे (जवळपास १२ लाख रुपये) बक्षीस मिळाले आहे. रुद्रांक्ष हा मागील काही काळापासून १० मीटर एअर रायफल स्पर्धेत कमाल कामगिरी करत एकामागे एक यश मिळवत आहे.  

ईजिप्त देशाची राजधानी कैरो येथे प्रेसिडेंट कप स्पर्धेचे सामने पार पडले. यावेळी भारतासाठी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत रुद्रांक्षने सुवर्णपदक जिंकले. नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेनंतर जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या अव्वल १२ व्या स्थानी असलेल्या नेमबाजांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पेार्ट फेडरेशनने (ISSF) या स्पर्धेसाठी टॉप १२ नेमबाजांना निमंत्रित करुन ही स्पर्धा आयोजित केली होती.