‘शेण नक्की खातंय कोण?’

भरत जाधवचा संतप्त सवाल..!

0 69

मुंबई (प्रतिनिधी) : ‘भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत’ राज्य तसेच देशामधील अनेक प्रश्नांना जबाबदार कोण आहे?. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा विनोद करुन माझ्यासारखा विनोदी कलाकार कंटाळलाय अगदी. याचा विनोद करायाच पण त्रास होतोय आम्हाला. ‘नक्की शेण खातयं कोण?’ असा सवाल मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेता भरत जाधवने उपस्थित केला आहे. राजकारण्यांवर टीका करणारा एक व्हिडिओ भरतने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने कोणाचेही नाव न घेता, ‘शेण नक्की कोण खातंय’ असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईतील रस्ते हा बॉलीवूडकरांमधील चर्चेचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी आरजे मलिष्काने खड्ड्यांचा विषयी टीका केली होती. भरतने पोस्ट केलेला व्हिडिओ मी एक सामान्य नागरिक आणि मतदार म्हणून पोस्ट करत असल्याचेहीत्याने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशातील एक नेता तिकडे जाऊन करार करतो याचा खूप आनंद होतो. आपण फटाके फोडून आनंद व्यक्त करतो. या कराराची माहिती मिळते. पण या करारामुळे भलं झाल्याची उदाहरणे मिळत नाहीत. मग यामध्ये नक्की शेण खातयं कोण?.

प्रत्येकजण आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी करावं यासाठी अभिमानाने झटत आहेत. त्यामुळे माझा राग आणि रोष हा एखाद्या पक्षाबद्दल नाहीय. पण मी जेव्हा मतदान करतो तेव्हा मला रस्त्यात खड्डेच दिसतात. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा विनोद करुन माझ्यासारखा विनोदी कलाकार कंटाळलाय अगदी. याचा विनोद करायाच पण त्रास होतोय आम्हाला. दरवर्षी दिवाळी येते तसे दरवर्षी खड्डे पडतात तर नक्की शेण खातयं कोण?,’ असं भरतने या व्हिडिओमधून विचारले आहे.

‘मी आता का बोलतोय तर राजाकारण्यांमुळे मला सवय लागलीय निवडणुका आल्या की ते येतात त्यांचे मत मांडतात. तर एक मतदार म्हणून मी मत देण्याआधी माझे मत मांडत आहे. तुम्हालाही ते व्यक्त करावं वाटतयं. तुम्हालाही अनेक प्रश्न असल्याचं दिसतयं. करा मत व्यक्त. पण मत व्यक्त करताना काय बोलावं कळत नसेल तर स्वत:लाही एकदा विचारा की तुमच्या विचारात शेण खातयं कोण?’,असेही भरत म्हणाला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More