मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

0
103

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील मराठा समाजाची उत्सुकता लागून राहिलेली  मराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाची निराशा झाली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून (बुधवार) सुरू होणार होती. मात्र, न्यायालयाने आज सुनावणीला स्थगिती देत ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले.

याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात बद्दल करून २० जानेवारीपासून हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. आता यातही बदल करत ५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी लांबणीवर टाकली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनांपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची मागणी केली होती. मात्र, ९ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला होता. तसेच २५ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले होते.