मराठा आरक्षणासाठी लढणारा लढवय्या हरपला : राजेश क्षीरसागर

0
117

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात निधन झालं ही अत्यंत दु:खद घटना आहे. प्रथम आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. स्वर्गीय विनायक मेटे विधानभवनात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा लढवय्या निघून गेला असल्याची भावना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज (रविवार) व्यक्त केली.

तसेच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित केलेल्या बैठकीला विनायक मेटे निघाले होते. त्यांचा निधनाने मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं आहे. समाजाची झालेली मोठी हानी न भरून निघणारी आहे, अशी भावना राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.