आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय : शरद पवार 

0
390

अहमदनगर (प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या, मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता माजी मंत्री मधुकर पिचड यांना लगावला.

पवार आज (रविवार) अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पिचड यांच्यावर निशाणा साधला. पवार म्हणाले की, राज्यातील जनतेला पक्ष बदलाची भूमिका आवडत नाही. विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतली, त्याचवेळी जनतेच्या मनातल कळलं होते. जनतेला परिवर्तन हवे होते, ते झाले आहे, असे म्हणत पवारांनी पिचड यांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.