मनसुख हिरेन प्रकरण : शरद पवारांचा उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला

0
21

मुंबई  (प्रतिनिधी) : मनसुख  हिरेन मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी  विधानसभेत आणि विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेत मोठा गदारोळ घातला. त्यामुळे  राज्यातील महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याचे पाहायला मिळाले. या  प्रकरणाची गंभीर दखल घेत  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच योग्य ती कार्यवाही करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे.  

या प्रकरणातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची बदली कऱण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली आहे. परंतु हिरेन यांच्या  पत्नीच्या जबाबाचा दाखल देत सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांना तत्काळ निलंबित करून अटक करण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी   सभागृहात सादर केलेल्या पुराव्यामुळे महाविकास आघाडी सरकारची नाचक्की झाल्याचे पाहायला मिळाले.