अंदाधुंद गोळीबारप्रकरणी अखेर मानसिंग बोंद्रेला अटक

0
426

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक कॉलनी परिसरात अंदाधुंद गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग बोंद्रे यांना  शुक्रवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गोळीबार केल्यानंतर बोंद्रे पसार झाला होता. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. अखेर रत्नागिरीतून बोंद्रे यांना  जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, बुधवारीच त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्‍च न्‍यायायलयाने फेटाळून लावला होता.

मालमत्तेच्‍या वादातून अभिषेक बोंद्रे आणि त्याच्या कुटुंबीयांवर गोळीबार केल्याचा आरोप मानसिंग बोंद्रे यांच्‍यावर करण्यात आला होता. याबाबत अभिषेक बोंद्रे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर मानसिंग बोंद्रे यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्‍न केल्याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्यानंतर पसार झालेल्या मानसिंग बोंद्रे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला होता. अखेर त्यांना  रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे.