‘पुणे पदवीधर’मधून संभाजी ब्रिगेडतर्फे मनोजकुमार गायकवाड लढणार…

0
76

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उद्योजक मनोजकुमार गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि प्रदेश संघटक डॉ. सुदर्शन तारख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, पुणे-सोलापूर येथील तरुण उद्योजक इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थी प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने झाली आहेत. एका तरुण उद्योजकाला संधी देण्याच्या उद्देशाने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.