मनमोहनसिंग, मोदी कसे झाले पंतप्रधान ? : प्रणव मुखर्जींचा मोठा खुलासा

0
148

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्रात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आत्मचरित्राच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने नुकतेच केले. यात प्रणव मुखर्जी यांनी आपल्या दोन्ही पंतप्रधानांची तुलना केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद मिळवले, तर मनमोहन सिंग यांना ते देण्यात आले होते, असा  उल्लेख मुखर्जी यांनी पुस्तकात केला आहे.

मुखर्जी यांनी पुस्तकात म्हटले आहे की, अनेक पंतप्रधानांसोबत संवाद साधण्याचे तसेच त्यांना जवळून जाणून घेण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे. प्रत्येकाचा दृष्टीकोन आणि शैली वेगळी होती. ते वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून होते. तसेच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे होते. आपण राष्ट्रपती असताना जुलै २०१२ ते मे २०१४ दरम्यान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मे २०१४ पासून ते जुलै २०१७ पर्यंत नरेंद्र मोदी या दोन पंतप्रधानांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान केले. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी २०१४ मध्ये झालेल्या झालेल्या भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाले. भाजपने त्यांना निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रतिमा तयार केली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद मिळवले .