हमिदवाडा (प्रतिनिधी) :  हमिदवाडा येथील  सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखानाच्या सन २०२०-२१या गळीत हंगामात ११.८७ टक्के इतका उच्चांकी साखर उतारा मिळाला असून मंडलिक कारखाना साखर उताऱ्यात विभागात अव्वल ठरला आहे.  तर यंदाच्या गळीत हंगामातील लाख ५१ हजार  साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक व संचालक मंडळाच्या हस्ते झाले.

या हंगामात ७ लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. कारखाना या हंगामामध्ये पूर्ण क्षमतेने सुरु असून कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन सरासरी ४००० मे. टन इतकी आहे. बॉयलरचे आधुनिकीकरण आणि इतर अनुषंगिक सुधारणा यामुळे कारखान्याचे प्रतिदिन ५००० मे. टनापर्यत गाळप होत आहे. याबद्दल चेअरमन मंडलिक यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक, चीफ इंजिनिअर, ची केमिस्ट, मुख्य शेती अधिकारी, सिव्हिल इंजिनिअर यांचा सत्कार करून अभिनंदन केले.  

या हंगामामध्ये दि. १६ ते ३०  नोव्हेंबर  या पंधरावड्यामध्ये एकूण गाळप ६८११९.७५९ मे. टन इतके झाले असून आज खेर साखर उतारा ११.८७ टक्के इतका उच्चांकी मिळाला आहे. एकू साखर उत्पादन २ लाख ५१  हजार क्विंटल इतके झाले आहे. तर सहवीज प्रकल्पातून १ कोटी ४० लाख ९८ हजार ३६० युनिट  वीज निर्मिती झाली आहे. त्यामधून कारखान्याने आजअखेर ८४ लाख ७ हजार ५३० युनिट विजेची विक्री केलेली आहे. तर कारखान्याकडे गळीतासाठी आलेल्या ऊस बिलापोटी एफआरपी प्रमाणे १९ कोटी ५२ लाख ३१ हजार रूपये  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.

यावेळी व्हा. चेअरमन बंडोपंत चौगुले, संचालक बापूसाहेब भोसले-पाटील, शिवाजीराव इंगळे, आनंदा मोरे, शहाजी पाटील, दिनकर पाटील, ॲड. वीरेंद्र मंडलिक, शहाजी यादव, जयसिंग गिरी बुवा, नंदिनीदेवी घोरपडे, राजश्री चौगुले, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक सर्जेराव पाटील, माजी संचालक नंदकुमार घोरपडे, कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.