इचलकरंजी (प्रतिनधी) : इचलकरंजीमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आज (सोमवार) सलग तिसऱ्या दिवशी गुटखा वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. नदीवेस नाक्याजवळील मरगुबाई मंदिराजवळ एका चारचाकी वाहनातून गुटखा वाहतूक करीत असताना पोलीसांनी सुमित कोठावळे याला अटक केली.

कोठावळे हा कर्नाटकामधून इचलकरंजीमार्गे जयसिंगपूरमध्ये हा गुटखा नेत होता. या कारवाईमध्ये एक चारचाकी गाडी आणि गुटखा असा एकूण ८ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याचे सपोनि. गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली राम पाटील, सुधीर गणंबावळे, नितीन जाधव, एम.वाय.पाटील, भरत मोहिते, यांनी केली.