इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील माळभाग परिसरातून सर्पमित्राच्या हातून साप हिसकावून घेतला. त्यानंतर दारूच्या नशेत  सापाला दगडाने ठार मारून जमिनीवर आपटले. या प्रकरणी अभिजित चंदूरे या तरुणाला अटक केली आहे. ही घटना आज (सोमवार) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकिवाट येथील माळभाग येथे सर्पमित्र श्रेयस धुमाळे व विश्वजित रजपूत यांनी अप्पु कोळी यांच्या घराच्या परिसरामधून धामन प्रजातीचा साडे पाच फूट लांबीचा साप पकडला होता. ते  पकडलेल्या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी जात होते. यावेळी अभिजित चंदूरे याने दारूच्या नशेत साप हिसकावून घेतला. आणि सापाला दगडाने ठार मारून जमिनीवर आपटले.

याची माहिती वन्यजीव प्राणी संस्थेचे पप्पु उर्फ पोपट खोत यांनी वन विभागास दिली. त्यानंतर वन विभागाचे एसीएफ निकम, ए.आर.ओ. सोनवणे, जी.ए.भोसले,  विजय पाटील, वनरक्षक जाधव, संदिप हजारे, वनरक्षक गजानन सकट यांनी घटना स्थळी येऊन  पोलीस पाटील सचिन कांबळे, हेल्पिंग हँन्ड रेस्क्यू फोर्सचे निलेश तवंदकर, ऋषि श्रीखंडे, अरुण ऐवळे, संतोष गायकवाड, मुकेश माळगे व सर्प मित्रांच्या सहकार्यांने आरोपीस ताब्यात घेतले.