कोल्हापूर (प्रतिनिधी) : चुये गावाजवळ बेकायदेशीर रिव्हॉल्वर विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एकाला अटक करण्यात आली. विलास दत्तात्रय गोगाणे (वय ५०, रा.चंद्रे, ता. राधानगरी) असे या आरोपीचे नाव आहे.  

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनां कोल्हापूर ते गारगोटी रस्त्यावर करवीर तालुक्यातील चुये गावाजवळ गावठी रिव्हॉल्वर विकण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती आज (गुरुवार) मिळाली होती. त्यानुसार पाळत ठेवुन विलास गाणे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ७ हजार ५०० रुपयांचे रिव्हॉल्वर (गावठी कट्टा) जप्त करण्यात आले.  याबाबत इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई सपोनि. किरण भोसले, पोलीस अंमलदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, रणजीत पाटील, बालाजी पाटील, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजीत कांबळे, नागेश साळोखे यांनी केली.