मुंबई (प्रतिनिधी) : ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोमधील स्पर्धकांच्या परफॉर्मन्सने जज मलायका अरोरा आनंदीत झाली होती. तर एका चिमुकलीच्या डान्सने मलायकाला कायम सतावणाऱ्या एका गोष्टीची पुन्हा एकदा जाणीव झाली. या शोमधील फ्लोरिनाच्या डान्स परफॉर्मन्सने मलायका भावूक झाली. यावेळी आपल्यालाही एक मुलगी हवी होती, अशी भावना मलायकाने व्यक्त केली.

एका मुलाखतीत बोलताना तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मलायकाच्या मनाला स्पर्श करणाऱ्या त्या खास परफॉर्मन्सच्या वेळी तिच्या मनात काय भावना होत्या. या प्रश्नावर मलायका म्हणाली, आपल्या मुलांच्या जवळ  असणे कोणत्याही आईला आवडते. फ्लोरिना माझ्या हृदयाला भिडली. तिच्या परफॉर्मन्सने मी न कळत तिच्याशी जोडले गेले. मी अशा कुटुंबातून आले जिथे खूप मुली होत्या आणि आता आमच्या कुटुंबात फक्त मुलचं आहेत. माझं माझा मुलगा अरहानवर प्रचंड प्रेम आहे. पण मला एक मुलगी असावी, अशी माझी इच्छा होती, असे मलायकाने सांगितले.