Published September 25, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचा नगररचना विभाग अधिक गतीमान, पारदर्शी आणि लोकाभिमूक करा. असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटटी यांनी आज नगररचना विभागातील अधिकाऱ्यांना दिले. यावेळी राजारामपूरी जनता बझार येथील महापालिकेच्या नगररचना विभागाला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेटटी यांनी आज भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

यावेळी आयुक्त म्हणाले की, नगररचना विभागातील प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढा. शहरातील सर्व सामान्य माणसाची बांधकाम परवान्यासाठी कसल्याही प्रकारे अडवणूक होता कामा नये. या कार्यालयात येणारा प्रत्येक नागरीक समाधानाने बाहेर पडेल असे कामाचे नियेाजन करा. नगररचना विभाग हा महापालिकेचे कान, नाक, डोळे असून हा विभाग अतिशय महत्वाचा आरक्षित बांधकामे ताब्यात घेऊन त्याचा त्या त्या कारणासाठी त्याचा वापर करण्याचे त्याचे नियोजन करावे, अशा सुचना दिल्या.

यावेळी सहाययक संचालक नगरचना प्रसाद गायकवाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता महादेव फुलारी, सुनिल भाईक, अक्षय आटकर, गुंजन भांबरे, सुरेश पाटील, मयूरी पटवेगार यांच्यासह नगररचना विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023