भुईबावडा घाटासाठी मास्टर प्लँन तयार करा – ना. सतेज पाटील

0
214

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (शनिवार) सकाळी गगनबावडा भुईबावडा घाट येथे पाहणी केली. अतिवृष्टीमुळे  घाटातील दरड कोसळण्याची घटना घडत आहे. तर घाट रस्ता देखील खचला आहे. यामुळे भुईबावडा घाटातून तळ कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रेटीकरणं करण्याबरोबरच या ठिकाणचे रस्ते काँक्रेटिकरणं करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अतिवृष्टीने रस्ते खचत असल्याने पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी  त्याचा मास्टर प्लॅन तयार करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहासिलदार रामदास झलके. सार्वञानिक बांधकाम विभाग उपअभियंता कुलकर्णी,  माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, डी वाय पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, उदय देसाई, गगनबावडा सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे आदी उपस्थित होते.