पूजा चव्हाणप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई  

0
106

पुणे (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील तरूणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी राज्यातील ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. या प्रकरणी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. तर अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याच्या कारणाने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी याप्रकऱणी मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणातील संशयित व गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची आता कसून चौकशी करण्यात येणार आहे. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची एकूण तीन पथकांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. याअगोदर पोलीस पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेणार आहेत, अशी   माहिती मिळत आहे. दरम्यान पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकऱणी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.