कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडमुडशिंगी गावातील आणि छ. राजाराम कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील याचा मुलगा सुदर्शन यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यानी आज (शनिवार) आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गडमुडशिंगीमधील मागील अनेक वर्षे महाडिक गटाचे नेतृत्व करणारे व  छ. राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता पाटील यांचा मुलगा सुदर्शन पाटील यांच्यासह गडमुडशिंगीमधील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शनिवारी आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला.

या वेळी आ. ऋतुराज पाटील म्हणाले की, दक्षिण मतदारसंघासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सातत्याने काम करीत आहोत. आम्ही कार्यकर्त्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. आगामी ग्रा. पं. निवडणुकीमध्ये गावातील सर्वांनी एकत्र येऊन सतेज पाटील गटाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आ. पाटील यांनी सांगितले.

या वेळी सुदर्शन पाटील म्हणाले की,  गडमुडशिगीच्या विकासासाठी आमच्या विश्वासातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन येथून पुढे पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू अशी ग्वाही सुदर्शन पाटील यांनी दिली.

या वेळी माजी सभापती प्रदीप झांबरे, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब माळी, रावसाहेब पाटील, विनोद सोनुले, तानाजी धनवडे, बागल कांबळे, सचिन पाटील, सुकुमार देशमुख, उत्तम शिंदे, भानुदास कांबळे, पांडुरंग पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.