आता श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देवस्थान समिती कठोर निर्णय घेणार : महेश जाधव (व्हिडिओ)

0
92

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुन्हा एकाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढत असून काही भक्त नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची बैठक घेऊन देवीच्या दर्शनासाठी कठोर निर्णय घेण्यात येईल, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.