लवकरच ‘मणिकर्णिका कुंड’ मूळ स्वरूपात… : महेश जाधव

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मणिकर्णिका कुंड आणि रामाच्या पाराचे काम प्रगतीपथावर असून लवकरच भाविकांना हे कुंड मूळ स्वरूपात पहायला मिळेल, अशी ग्वाही आज (सोमवार) पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

महेश जाधव व मणिकर्णिका समितीचे सदस्य यांच्यामध्ये आज गरुड मंडप येथे आढावा बैठक झाली. जाधव म्हणाले की, मंदिरातील रामाच्या पाराचे काम आणि मणकर्णिका कुंडाचे काम जोरात सुरू असून दोन्ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

या बैठकीला सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, ‘पुरातत्त्व’चे कांबळे, मंदिर अभ्यासक राणिंगा, नेर्लेकर, आर्किटेक्ट निंबाळकर, देवस्थान समितीचे इंजिनिअर देशपांडे, सुयश पाटील आदी उपस्थित होते