‘महेंद्र ज्वेलर्स’तर्फे २० फेब्रुवारीला नोकरदार, व्यावसायिक महिलांचा सन्मान

0
87

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रथितयश ज्वेलर्स महेंद्र ज्वेलर्सच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्त ६० किलोमीटरचा प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांचा ‘ग्रेट ताई’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे. हा सत्कार २० फेब्रुवारीरोजी करण्यात येणार आहे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या कष्टाळू महिलांना यावेळी सन्मानित करुन सामाजिक बांधिलकीची नवी अनोखी चैतन्यदायी भावना जपली जाणार आहे.

माताजी पोपटबेन संघवी, ग्राहक रंगराव मगदूम, सुनिता पाटील, अनुराधा रांगणेकर, चार्टड अकौंटंट आनंद पल्लोडे, साक्षी पल्लोडे, नितीन टिपकुर्ले, वैषाली टिपकुर्ले यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला.

कोल्हापूर जिल्यातील अनेक महिला नोकरी, व्यवसाय निमित्ताने रोज प्रवास करतात. सांसारिक जबाबदारी सांभाळून या महिला नोकरी करतात. ज्या महिलांचे राहते घर आणि नोकरीचे ठिकाण ६० किलोमीटर पेक्षा जास्त आहे, अशा निवडक महिलांचा प्रातिनिधिक सत्कार महेंद्र ज्वेलर्सतर्फे करण्यात येणार आहे.

या महिलांच्या कष्टातून त्यांनी ऊर्जेचा, चैतन्याचा कर्तृत्वाचा ठसा समाजावर उमटविला आहे. अशा महिलांच्या सत्कारातून त्यांचा संघर्ष, प्रयत्नवाद यांना दिलेली ही मानवंदना असेल. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरदार, व्यावसाईक महिलांनी ८५९६८५८५९६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.