महेंद्र ज्वेलर्सतर्फे सीपीआर रुग्णालयात १ हजार एन९५ मास्कचे वाटप

0
29

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रशासनाकडून या कोरोनाकाळात सगळ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे.

याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जिल्हातील सुप्रसिद्ध व्यापारी आणि महेंद्र ज्वेलर्सचे मालक भरतभाई सोनमलजी ओसवाल यांनी सीपीआर रुग्णालयात १ हजार एन९५ मास्कचे वाटप केले आले. हे वाटप नगरसेवक ईश्वर शांतीलालजी परमार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बंटी सावंत, डॉ. अपरिजीत वालावलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here