यड्रावमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ (व्हिडिओ)…

0
137

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  यड्रावमध्ये महाविकास आघाडीने प्रचाराला आज (मंगळवार) शुभारंभ केला. शिरोळ तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन मिळालेली यड्रावची ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. यावेळी पारंपारिक वाद्याच्या गजरात गावातील सर्व धार्मिक स्थळे आणि ग्रामदेवतांचे उमेदवारांनी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

 

यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सतेंद्रराजे नाईक- निंबाळकर, कुणालसिंह नाईक-निंबाळकर, महावीर पाटील, सरदार सुतार, शिवाजी दळवी यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते