कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून सीमावासीय १ नोव्हेंबरला मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात काळा दिवस पाळतात. या दिवशी आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार मुस्कटदाबी करत आहे. म्हणून शिवसेनेसह  महाविकास आघाडी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहील,  अशी ग्वाही उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले की, आज कर्नाटकच्या सीमा बंद करून महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या नेत्यांची अडवणूक करण्याचे काम कर्नाटक पोलिस प्रशासन करत आहे. चीनमधून घुसघोरी सुरू असताना कर्नाटकच्या सीमा महाराष्ट्रातील नेत्यांसाठी बंद करणे चुकीचे आहे. तेथील उपमुख्यमंत्र्यांना सीमाभाग सूर्यचंद्र असेपर्यंत महाराष्ट्रात जाणार नाही, अशी वल्गना केली आहे. ही गर्जना त्यांची खूर्ची मजबुतीसाठी आहे. पण याला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख उत्तर दिले आहे.