महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने

0
57

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू आहे, असे ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर दुसरीकडे मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरणमंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा बरखास्त करण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.