ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले नाहीत : फडणवीस

0
52

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवर विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘हात धुवून मागे लागू’ असे म्हणणारे उद्धव ठाकरेंसारखे धमकावणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवरच्या इतिहासात पाहिले नाहीत.

‘उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीला शोभणारं’, नाही अशी टीका  देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीवर भाजपने आज (शनिवार) ‘ठाकरे सरकारची काळी पत्रिका’ नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याचे सांगत सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे सांगितले. सरकारने पहिल्या वर्षात फक्त निर्णयांना स्थगिती देण्याचे काम केल्याची टीकाही यावेळी फडणवीसांना केली.