कळे येथे महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्द प्रतिसाद…

0
15

कळे (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथील झालेल्या प्रकाराबाबत शेतकरी आणि महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठेतील भगवा चौक येथे पन्हाळा तालुका शिवसेनेच्या वतीने  केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी संपुर्ण बाजारपेठ बंद ठेवून उत्स्फूर्दपणे पाठिंबा दिला. यावेळी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि  केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी सुरेश पवार, प्रशांत पवार, अशोक डवंग, संभाजी पाटील, कळे सरपंच सुभाष पाटील, सर्जेराव मोळे, बाळासाहेब मोळे, युवराज पाटील, शहाजी चव्हाण, सागर पाटील, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.