‘कोल्हापूर उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना महाराष्ट्र बहुजन सेनेचा पाठिंबा

0 100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बहुजन समाजातील विविध जाती जमातींमधून उद्योजक निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्याच बांधवांना रोजगार मिळवून द्यावेत अशी त्यांची तीव्र इच्छा होती. हीच परंपरा हजारो युवकांना हक्काचा रोजगार देऊन चंद्रकांत जाधव यांनी राखली आहे. उद्योगनगरी कोल्हापूरला गतिमानता येण्यासाठीच महाराष्ट्र बहुजन सेना त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे, अशी घोषणा आज (बुधवार) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष राजू वायदंडे यांनी दिली.

रोजगार मागणारी नव्हे तर रोजगार निर्माण करून देणारी उद्योग व्यावसायिकांची पिढी निर्माण होणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका डॉ. आंबेडकरांनी वारंवार मांडली होती. हजारो कुटुंबांचा तारणहार होऊन द्रकांत जाधव यांनी हे दाखवून दिले आहे. बहुजन समाजातील युवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष विजय तडाखे यांनी केले.

चंद्रकांत जाधव यांनी आपल्या उद्योग व्यवसायातून महिलांना संधी दिली आहे. त्यामुळेच निम्म्या टक्केवारीत मतदार असलेल्या महिलांचाही जाधव यांना निर्णायक पाठिंबा आहे, असे प्रतिपादन बहुजन सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शारदा यादव यांनी केले.
शहराध्यक्ष रवी माने-राज माने, शहर सचिव राहुल आलकुडे, शहर संघटक बापू साठे, हातकणंगले तालुकाध्यक्ष कुमार घाडगे, सचिन भोरे, आकाश चौगले, सागर चांदणे यांनीही चंद्रकांत जाधव यांना जाहीर पाठिंबा असल्याचे पत्रकाद्वारे घोषित केले आहे.

महाराष्ट्र बहुजन सेनेच्या या क्रांतिकारी भूमिकेमुळे आपला विजय आता पक्का झाला आहे, या विश्वासाला कदापिही तडे जाऊ देणार नाही, अशी भावना चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More