राज्यभरात मतदानावर ‘ईव्हीएम’ बिघाडचे संकट, काँग्रेसकडून २२१ लेखी तक्रारी..!

0 367

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या गुरुवारी (२४ ऑक्टोबर) निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. ३ हजार २३७  उमेदवार रिंगणात आहेत. राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र राज्याच्या विविध भागातून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बूथ क्रमांक २१९ मध्ये ईव्हीएम मशीन बंद होते. तर सांगलीमध्ये ३ मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता.  

हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील बूथ क्रमांक २१९ मध्ये ईव्हीएम मशीन बंद असल्यामुळे तासाभरापासून मतदान बंद होते. सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक ६३ वर आणि डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडले. तासगावमधील आरवडेमध्ये ५० मिनिटे मतदान यंत्र बंद पडले.

चाळीसगावात मतदान केंद्र क्र. ३१० वलठान ईव्हीएम बंद पडले. सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.२०५ मध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच बिघाड झाला होता. त्यामुळे तासाभराने मतदान सुरु झाले. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर एक तासापासून ईव्हीएम मशिन बंद होते. मोहगाव येथील बुथ क्रमांक ५० च्या वरील मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. यावेळी मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग लागली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More