कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सत्तारूढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी. एन. पाटील यांनी आज (शुक्रवार) संचालकांची बैठक घेऊन त्यांच्या मतदानाबाबत आढावा घेतला.

गोकुळच्या ताराबाई पार्क येथे घेतलेल्या या बैठकीला गोकुळचे १८ पैकी १३ संचालक उपस्थित होते. प्रत्येक संचालकांकडून त्यांच्या मतदाराबाबत माहिती घेतली. तसेच आगामी व्युहरचनेबाबत प्राथमिक चर्चा केली. असे माजी आ. महादेवराव महाडिक आणि आ. पी. एन. पाटील यांनी सांगितले.

या आढावा बैठकीला चेअरमन रवींद्र आपटे, संचालक अरुण नरके, रणजीतसिंह पाटील, पी डी धुंदरे, विश्वास पाटील, विश्वासराव जाधव, अंबरीशसिंह घाटगे, धैर्यशील पाटील, बाळासाहेब खाडे, बाबा देसाई आदी उपस्थित होते.