वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीसाठी महाडिक, कोरे, आवाडे एकत्र…

0
496

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीसाठी महादेवराव महाडिक, आ. विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांची वारणा येथे आज (मंगळवार) सायंकाळी बैठक झाली. सध्यस्थीतीत या तीन नेत्यांचेच वर्चस्व असून या युतीत लवकरच,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी सामील होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर देखील या युतीला मदत करण्याच्या मानसिकतेत आहेत. भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकरही यांच्याबरोबरच जाण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत घोषणा होणार असून महाविकास आघाडीला वडगाव बाजार समितीमध्ये फारसा वाव मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी माजी आ. अमल महाडिक, समितीचे माजी चेअरमन सुरेश पाटील, राजाराम कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, शहाजी पाटील राजवर्धन मोहिते विलास खानविलकर उपस्थित होते.