टोप (प्रतिनिधी) : शिरोलीचा विकास हा सुज्ञ नागरिक आणि समर्थकांच्या सहकार्याने आम्ही करू शकलो. भविष्यातही शिरोली गावाबरोबर मतदारसंघाचा विकास करण्यास महाडिक कुटूंबीय कटीबद्ध आहे. असे मत जि.प.च्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केले. त्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या उद्घाटनावेळी बोलत होत्या.

पुलाची शिरोली येथील छ. शिवाजीनगर कमान ते यादववाडी या रस्त्यासाठी सुमारे ३५.५७ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ आज (सोमवार) शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. हा निधी शौमिका महाडिक यांच्या फंडातून मंजूर करण्यात आला आहे. यावेळी ग्रा.पं.सदस्य बाजीराव पाटील म्हणाले, शिरोली गावासाठी माजी आर अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. तरी विरोधकांनी त्यांच्या कामाचे श्रेय घ्यायचे थांबवून जनतेची दिशाभूल करु नये. तसेच विकास कामांना एक खो घालायचे काम बंद करण्याचा इशारा दिला.

यावेळी सुरेश पाटील, ग्रा.पं.सदस्य पुष्पा पाटील, बाबासाहेब कांबळे, ग्रा.पं. सदस्य श्वेता गुरव, संध्याराणी कुरणे, प्रकाश कौंदाडे, विनायक कुंभार, सुर्यकांत खटाळे, अनिल शिरोळे, आरिफ सर्जेखान, कार्यकर्ते उपस्थित होते.