राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव व्हरकट यांची निवड झाली. व्हरकट हे प्राथमिक आरोग्य केंद्र, सरवडे येथे कार्यरत आहेत. या निवडीसाठी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्र सरवडे, तसेच श्रीकर पोवार, वसंत पाटील, हरिभाऊ पाटील, अभय नाईक, अर्जुन शेटके, सागर पवार, प्रवीण मनुगडे, गीतांजली चौगुले, रंजना आडके, प्रभावती जाधव, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
ना. सतेज पाटील म्हणजे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करणारा सच्चा नेता : गोपाळराव पाटील (व्हिडिओ)
सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करणारा सच्चा नेता म्हणजे ना. सतेज पाटील होत. खऱ्या अर्थाने आपण जिल्ह्याचा ‘पालक’ असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केली.
ना. बंटीसाहेबांमुळे आम्हाला ‘आजरा-गडहिंग्लज-चंदगड’मध्ये विकासगंगा आणणे शक्य : विद्याधर गुरबे (व्हिडिओ)
ना. सतेज उर्फ बंटी पाटीलसाहेबांमुळेच आम्हाला ‘आजरा-गडहिंग्लज-चंदगड’ मतदारसंघात विकासगंगा आणणे शक्य झाल्याची भावना काँग्रेसचे आजरा-गडहिंग्लज-चंदगडचे समन्वयक विद्याधर गुरबे यांनी व्यक्त केली.
https://www.youtube.com/embed/0cP1QaGl0Ig
बंटीसाहेबांमुळेच राज्यातल्या पहिल्या कम्युनिटी क्लिनिक उभारणीचा मान कोल्हापूरला… – भूपाल शेटे (व्हिडिओ)
ना. सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच राज्यातील पहिलं कम्युनिटी क्लिनिक उभारण्याचा मान कोल्हापूरला मिळाला असल्याचे मत माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी व्यक्त केले.
बंटीसाहेबांमुळेच थेट पाईपलाईनसह मूलभूत प्रश्न मार्गी : उदय सासणे (व्हिडिओ)
ना. सतेज पाटील यांच्यामुळे थेट पाईपलाईनसह कोल्हापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले असल्याचे उदय सासणे यांनी सांगितले.
https://www.youtube.com/embed/NRUzTLMROSQ
ना. सतेज पाटील खऱ्या अर्थाने ‘कोल्हापूर’चे ‘पालक’मंत्री ! – किरण पाटील (व्हिडिओ)
‘पालक’ या शब्दाचा अर्थ काय असतो हे ना. सतेज पाटील यांनी कार्यातून दाखवून दिले असल्याचे मत किरण पाटील यांनी व्यक्त केले.
https://www.youtube.com/embed/pnrx4f-1K7M