इचलकरंजी परिसरातील महादेव मंदिरे गुरूवारी बंद

0
17

शिरोळ (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व महादेव मंदिरे गुरुवारी (दि.११)  बंद ठेवण्यात येणार आहेत.  महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महादेव मंदिर परिसरात गुरूवारी  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मंदिरामध्ये येऊ नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. महाशिवरात्री निमित्त शहरातील नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याची अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.