हसन मुश्रीफ लवकर बरे व्हावेत म्हणून महादेवाला महाअभिषेक

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रतील गरिबांचे आणि गरजूंचे महा डॉक्टर, वृद्धांचे श्रावणबाळ, लाखो कार्यकर्त्यांचे दैवत, महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे लवकर बरे व्हावेत म्हणून कोल्हापूर येथील रावणेश्वर मंदिरातील महादेवाला लघु रुद्र महाअभिषेक घालण्यात आला.

हसन मुश्रीफ हे कोरोनावर यशस्वी मात करून लवकर परत जनसेवेत पुन्हा नव्या जोमाने रुजू व्हावेत. तसेच ईश्वर त्यांना भविष्यात उदंड आयुष्य आणि निरोगी स्वास्थ्य देवो, म्हणून राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण, विध्यार्थी अध्यक्ष प्रसाद उगवे यांच्यावतीने हा महाअभिषेक घालण्यात आला. यावेळी विघ्नेश आरते, कुमार कुंभार, शांतिजीत कदम, कैलास कांबळे, लौकिक गायकवाड, पुजारी अशोक भोरे उपस्थित होते.