ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा

0
384

मुंबई (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने   कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद केला आहे.

तांदळामध्ये  एकनाथ शिंदे  यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा किंवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्याकरिता या अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.  यामागील सूत्रधारांचा अधिक शोध पोलिसांनी सुरू केला आहे.