साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील विद्या मंदिर कावळटेक सारख्या ठिकाणच्या १ ते ५ शाळेला एकही विद्यार्थी नसताना शिकवायला एक शिक्षक आहे. परंतु, गगनबावड्यातील श्री माधव विद्यालया मंजूर तीन पदे असताना सध्या इथे एकच शिक्षिका कार्यरत आहे उर्वरित दोन पदे ही रिक्त आहेत. या शाळेची पटसंख्या ७५ इतकी आहे. ही रिक्त पदे भरावीत अशी मागणी निवेदनाद्वारे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी वेळोवेळी पंचायत समितीला भेटी देऊन उर्वरित दोन पदांची मागणी केली आहे. परंतु याबाबतची दखल कोणत्याही अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. तरी सर्व पालक व ग्रामस्थांनी ही सर्व रिक्त पदे तात्काळ न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तरी लवकरात लवकर रिक्त पदे भरून विद्यार्थ्याचे होणारे नुकसान थांबावावे अशी मागणी निवेदनद्वारे गगनबावडा गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी तंटामुक्त अध्यक्ष भगवान सावंत, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष जावेद अत्तार, गिरीश प्रभूलकर, अविनाश भांबुरे, सुनिल गवळी आदी उपस्थित होते.