मोहोळ (प्रतिनिधी)

तेलंगवाडी तालुका मोहोळ येथील संतोष तुकाराम शेंडे या शेतकऱ्याच्या घरात झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत घरासह रोख रकमेसह प्रापंचिक साहित्य जळून  खाक झाल्याचे समोर आले आहे.

संतोष शेंडे यांच्या घरातील गॅस गळतीमुळे घरास आग लागली. यामध्ये जनावराचा गोठा, रोख रक्कम, प्रापंचिक साहित्य जाळून खाक झाले. यामध्ये एक जर्सी गाय, एक म्हैस व एक लहान रेडकू भाजले आहे. या आगीत संतोष शेंडे या शेतकऱ्याचे एकूण ३ लाख २२ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी यांनी केला असून, त्याचा अहवाल प्रशासनाकडे दिला आहे.