गारगोटी आगारातून लांबपल्ल्याची बससेवा सुरू : दिलीप ठोंबरे

0
90

मुरगूड (प्रतिनिधी) : गारगोटी आगारातून १३ जूनपासून स्वारगेट,परेल अशा लांबपल्ल्याच्या मार्गावरील बससेवा सुरू होत आहे. अशी माहिती ती गारगोटीचे एसटी आगारप्रमुख दिलीप ठोंबरे यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या कोवीड–१९ संबंधीच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून काल (रविवार) पासून गारगोटी-स्वारगेट सकाळी ७ वा. (साधी), गारगोटी-स्वारगेट सकाळी ८.३० (साधी) आणि गारगोटी-परेल सायंकाळी ५.४५ वा. (शयनयान) बस आहे. तसेच आज (सोमवार ) पासून गारगोटी-स्वारगेट सकाळी ०६.०० वा. (साधी) बस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येत आहेत . तसेच जिल्हातंर्गत कोल्हापूर, गडहिंग्लज व मुरगूड मार्गावरही एसटीच्या फेऱ्यांची संख्या वाढवल्या असून जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठोंबरे यांनी दिली आहे.