जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या स्थानिक सुट्ट्या…

0
823

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नव्या वर्षासाठी ३ दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. आताच या सुट्टया जाहीर केल्याने नवीन वर्षातील सलग सुट्टी घेऊन कामाचे किंवा पर्यटनाचे नियोजन करता येणार आहे.

स्थानिक सुट्ट्यांमध्ये गौरी गणपती विसर्जन (घरगुती) मंगळवार दिनांक १४ सप्टेंबर, घटस्थापना गुरूवार दिनांक ७ ऑक्टोबर, धनत्रयोदशी मंगळवार दिनांक २ नोव्हेंबर असे तीन दिवस शहर आणि जिल्हयातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे.