चक्क निवडणूक अधिकाऱ्याकडेच सापडली लोडेड रिव्हॉल्व्हर…

0
109

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्ह्यात ग्राम पंचायतीसाठीच्या पहिल्या टप्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, बेळगाव तालुक्यातील देसुर येथील मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याकडे लोडेड रिव्हॉल्व्हर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या रिव्हॉल्व्हर प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्याकडे आढळून आलेली रिव्हॉल्व्हर लोडेड आहे. यामुळे पंचक्रोशीत उलट, सुटल चर्चा सुरू आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडेच रिव्हॉल्व्हर मिळाल्याची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे. ते त्वरीत मतदान केंद्रावर धाव घेऊन रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आहे.