कळे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धामणीखोऱ्यात एसटीची सेवा थांबवण्यात आली होती. त्यामुळे भागातील अनेक कामगार आणि नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास गैरसोय होत होती. याचा पाठपुरावा लाईव्ह मराठीने केला होता. याची दखल घेत एसटी महामंडळाने सध्या काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली केली असून लाईव्ह मराठीच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

धामणीखोऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा बंद केली होती. लाईव्ह मराठीने यासंदर्भातील लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीची सर्वात पहिले वृत्ताकंन केले होते. त्यामुळे परिवहन विभाग आणि संभाजीनगर येथील  डेपो मँनेजर यांनी याची दखल घेत ही सेवा पुर्ववत सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून धामणीखोऱ्यात म्हासुर्ली-बावेली आणि चौके-गवशी अशी एसटीची सेवा सुरू करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान पसरले असून त्यांनी लाईव्ह मराठीचे आभारही व्यक्त केले आहे.

यासाठी पं. स. समिती सदस्य रेखा बोगरे, संभाजीनगरचे डेपो मँनेजर उत्तम पाटील, जिल्हा एसटी कामगार अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव वसंत पाटील, एटीआय संभाजीनगर आगार सागर पाटील, बाबूराव कांबळे यांनी प्रयत्न केले.