‘लाईव्ह मराठी’ इम्पॅक्ट : गडहिंग्लजमध्ये एकेरी वाहतूक सुरू

0
254

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  गडहिंग्लजमध्ये रविवारी बाजार भरत असतो. यावेळी वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीचा बोजवारा उडतो. याबाबत रविवारी (दि.३) ‘लाईव्ह मराठीने’ ‘गडहिंग्लजमध्ये वाहतुकीचा बोजवारा’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती.  याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी उपाययोजना करत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एकेरी मार्ग केले आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी फुटण्यास मदत झाली आहे. याबद्दल नागरिक आणि वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.     

गडहिंग्लजमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक, वाहनधारक त्रस्त झाले होते. रविवारी बाजार भऱत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. नागरिकांना चालताना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत होते. दरम्यान,  आज (रविवार) सकाळ पासूनच पोलीस प्रशासनने वाहतुकीचे नियोजन करून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.  शहरात येणारी सर्व अवजड वाहने चर्च रोड मार्गे वळवून शहरातील मुख्य रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे.  यामुळे नागरिक आणि वाहनधारकांतून  समाधान व्यक्त केले जात आहे.