लाईव्ह मराठी ब्रेकिंग : इस्पुर्ली येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
622

गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर ते गारगोटी मार्गावर इस्पुर्ली पेट्रोल पंपाजवळ आज (रविवार) सायंकाळी साडे सातच्या सुमारास झालेल्या अपघातात निगवे खालसाचा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रस्त्याच्याकडेला उभारलेल्या एका ऊसाच्या ट्रॉलीला त्याने मागून धडक दिल्याने या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. परंतु , या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अद्याप समजले नाही.