कुंभी कासारी कारखाना वाचविण्यासाठी समविचारी नेत्यांची गरज : प्रा. टी. एल. पाटील

0
298

सावरवाडी (प्रतिनिधी) : कुंभी कासारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा होता. हा साखर कारखान्याचा  राजकारणासाठी वापर केला गेल्याने कारखाना डबघाईला आला. कर्जबाजारी बनलेल्या कुंभी कासारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीसाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत शेतकरी चळवळीचे नेते व यशवंत बँकेचे संचालक प्रा. टी. एल. पाटील यांनी व्यक्त केले.

कारखाना कर्जबाजारी बनला असून कर्जमुक्त होणे कठीण आहे. कामगारांचा पगार वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनंत अडचणीं समोर हा कारखाना आहे. गेल्या ६ दशकांपासून कारखान्यात कोणताच विकास झालेला नाही. वस्तुस्थिती असल्याचे सांगून प्रा. पाटील म्हणाले शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेला हा कारखाना भविष्यात मोडकळीस येण्याची दाट शक्तता आहे.

कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी समविचारी नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सत्तारूढ गटाला आगामी निवडणूक कठीण जाणार आहे. शेतकरी जागरूक असून नवा आदर्श पर्याय उभा करावा लागेल. कुंभी कासारी साखर कारखाना वाचला तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा आत्मविश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.