राज्यातील ग्रंथालये उद्यापासून होणार सुरू !

0
113

कोल्हापूर  (प्रतिनिधी)  : कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील ग्रंथालये गुरुवार दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा आदेश सरकारने घेतला आहे. याशिवाय टप्याटप्याने मेट्रोची सेवाही सुरू होणार आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सार्वजनिक ग्रंथालये बंद होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने काही सेवा सुरु झाल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवाही पूर्ववत झाली आहे. यामुळे ग्रंथालये सुरू करावीत, अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे वाचनप्रेमींंची सोय होणार आहे.