आता तरी सत्ता घेऊया : आंबेडकरी पक्ष संघटनांचा निर्णय

0
24

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बहुजन ऐक्य चळवळ कोल्हापूरच्या वतीने आंबेडकरी पक्ष संघटनांनी महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवावी, असा निर्णय परिषदेमध्ये घेण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षस्थानी बहुजन ऐक्यचे मच्छिंद्र कांबळे होते.

या परिषदेत बाबासाहेबांच्या स्वप्नातला सत्ताधारी समाज निर्माण करण्यासाठी महानगर पालिकेची निवडणूक लढवावी. यासाठी परिषद घेण्यात आली. यामध्ये किमान समान कार्यक्रम ठरवून ही निवडणूक लढवून सत्ताधारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र यावे, असा विचार पक्ष संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला.

या परिषदेत आरपीआयचे प्रा. शहाजी कांबळे, कास्ट्राईबचे नामदेवराव कांबळे, बीआरएसपीचे आर. के. कांबळे,  डॉ. सुनील पाटील, कॉ. रघुनाथ कांबळे, बाजीराव नाईक, रघुनाथ मांडरे, सुशीलकुमार कोल्हटकर यांनी सहभाग घेतला.