कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पुर्वीच्या काळी बळीराजा नावाच्या राजाने शेतकऱ्यांसाठी कृषिप्रधान धोरणे राबवून शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. त्या काळात समाजात समानता निर्माण केली. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे राज्य येण्यासाठी बळीराजा गावागावांत पोहचवूया.असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूरचे माजी प्राध्यापक विश्वास सायनाकर यांनी केले.

ते कोल्हापूरात श्री शाहू सत्यशोधक समितीच्या वतीने आयोजित बळीराजा महोत्सवानिमित्त बळीराजा सन्मान पुरस्कारा निमित्त बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शाहू सत्यशोधक समाज आणि बळीराजा उत्सव समितीचे अध्यक्ष बाबूराव कदम होते. यावेळी काँ.अनिल चव्हाण ,नामदेव कांबळे, स्वाती कृष्णात, शफिक देसाई ,श्रीमती दयमंती कडोकर यांना सन्मानचिन्ह ,शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.